महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य असून या राज्याच्या सर्वांगीण विकासात उद्योग विभागाचे मोठे योगदान आहे. राज्याची उद्यमशील प्रतिमा संवर्धनासाठी, प्रगतीशील व पुरोगामी ध्येयांची आखणी व अंमलबजावणी करणे, नवनवीन उद्योगांच्या उभारणीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे, स्वदेशी तसेच परदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम ठेवून सातत्यपूर्ण विकास साधणे. त्याव्दारे रोजगार निर्मिती त्याचप्रमाणे मानवी संसाधने आणि पायाभूत सुविधांमध्ये वृद्धी करणे हे या विभागाचे ध्येय-धोरण आहे. या ध्येय धोरणांच्या अनुषंगाने उद्योग विभाग खालीलप्रमाणे कार्यरत आहे:
• विभाग आणि विभागाच्या अधिनस्त असलेल्या विविध कार्यालयांच्या सहकार्याने औद्योगिक धोरण तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे,
• राज्याच्या संर्वांगीण विकासासाठी गुंतवणूक आकर्षित करणे, खाजगी क्षेत्रातील विविध उद्योगांबरोबर उद्योग विकासाचे करार करणे,
• औद्योगिक पायाभूत सुविधांचा आणि औद्योगिक क्षेत्रांचा विकास करणे,
• निर्यात वृध्दीसाठी राज्याचा निर्यात एक्सपोर्ट ॲक्शन प्लॅन तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे,
• राज्याच्या विविध औद्योगिक व रोजगार योजनांची प्रसिध्दी व प्रचार,
• राज्यात नव उद्योजक निर्माण करणे आणि त्यातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे,
• राज्यातील कान्याकोपऱ्यात उद्योजकता विकास,
• उद्योग विकासासाठी लागणाऱ्या परवानग्या, जलद आणि कालमर्यादेत देण्यासाठी एक खिडकी योजना व उद्योग सुलभता कार्यक्रम राबविणे.
उद्योग विभागाने औद्योगिक विकासासाठी खालील उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत:-
1. कृषी आधारीत व माहिती तंत्रज्ञान उद्योगांना प्रोत्साहन.
2. ग्रामीण व लघुउद्योग विकास.
3. उद्योजकता विकास
4. सहकारी औद्योगिक वसाहती.
5. पायाभूत क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रांचा सहभाग.
6. आजारी उद्योगांचे पुनर्वसन.
7. उद्योगांना वित्तीय सहाय्य.
8. निर्यात प्रचलनात वाढ.